प्रति,
मुख्याध्यापक/प्राचार्य,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,
सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन जिल्हा अहमदनगर
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शालांमध्ये राबविण्यात येत आहे. *या अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील केवळ 341 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी नोंदणी केली आहे. सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांनी या अभियानात सहभागी* *होणे अनिवार्य आहे.आज शुक्रवार दि.19 जानेवारी 2024 अखेर स्कूल पोर्टलवरील 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या टॅबमध्ये आपल्या शाळेतील उपक्रमांची माहिती तात्काळ भरावी.सदर अभियान कालमर्यादित असल्याने यामध्ये विलंब होणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.*
शिक्षणाधिकारी माध्यमिक,
जिल्हा परिषद अहमदनगर